TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 10 ऑगस्ट 2021 – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी टास्क फोर्स सोबतची बैठक झाली. या बैठकीत धार्मिकस्थळं, रेस्टॉरंट, मॉल उघडण्याबाबत चर्चा झाली. यानंतर मॉल धार्मिकस्थळं, रेस्टॉरंट आणि मॉल यांना लागू असलेले निर्बंध शिथिल होणार आहेत, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, यावर या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही.

तसेच मागील वर्षीप्रमाणे यंदाही सणांचं साधं रुप असणार आहे, असेही या बैठकीत ठरवलं आहे. टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवरही चर्चा झाली. यावेळी ऑक्सिजनची उपल्बधता तसेच लसीकरणावर याबाबत चर्चा झाली.

टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये संभाव्य तिसरी लाट, ऑक्सिजनची लागणारी गरज, लसीकरणाचा वेग वाढवणे, ट्रेसिंग, ट्रॅकिंग वाढवणे या विषयांवर चर्चा केली आहे. येणाऱ्या काळात आणखी काही क्षेत्रांच्या बाबतीत सावधानता बाळगून कशा प्रकारे निर्बंधात शिथिलता आणायची? यावर या टास्क फोर्सकडून सांगितलं आहे.

यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, डॉक्टर संजय ओक, डॉक्टर शशांक जोशी, मेहुल मेहता, डॉक्टर झहीर विराणी, डॉक्टर राहुल पंडित, वसंत नागवेकर, डॉक्टर सुहास प्रभू, डॉक्टर अजित देसाई, ओम श्रीवास्तव, डॉक्टर उदवाडिया,अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास हे उपस्थित होते.

टास्क फोर्स बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे –
हॉटेल- रेस्टॉरंट आणि मॉल खुले करण्यासंदर्भात झाली चर्चा.
हॉटेल-रेस्टॉरंट -मॉल यांना टप्प्याटप्याने शिथिलता देणार
हॉटेल – रेस्टॉरंटला रात्री 10 पर्यंत शिथीलता देणार
काटेकोर नियमावली तयार करणार
मॉल खुले झाल्यास काटेकोर नियमांची अंमलबजावणी आवश्यक.
तसेच धार्मिक कार्यक्रम, प्रार्थनास्थळे, सामाजिक कार्यक्रम यात शिथीलता देणार नाही.