टिओडी मराठी, टोकियो, दि. 25 जुलै 2021 – भारताला मीराबाई चानूमुळे टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पहिले रौप्यपदक जिंकून दिलं आहे. अशात आता ऍथलीट्सच्या प्रशिक्षकांसाठी चांगली बातमी समोर आलीय. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने शनिवारी (दि. 24 जुलै) ऍथलीट्ससोबत टोकियो ऑलिम्पिकमध्ये असणाऱ्या आणि त्यांना ट्रेनिंग देणाऱ्या प्रशिक्षकांसाठी रोख बक्षिसाची घोषणा केलीय.
ज्या प्रशिक्षकाने ऍथलीटला सुवर्णपदक जिंकण्यासाठी मदत केलीय. त्या प्रशिक्षकाला 12.5 लाख रुपये देणार आहेत. तसेच ज्या प्रशिक्षकाने ऍथलीटला रौप्यपदक जिंकण्यासाठी मदत केलीय. त्याला 10 लाख रुपये आणि कांस्यपदकासाठी मदत करणाऱ्या प्रशिक्षकाला 7.5 लाख रुपये देणार आहे.
याबाबत भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष राजीव मेहता म्हणाले, जे प्रशिक्षक खेळाडूंसोबत येथे आहेत आणि त्यांना ट्रेनिंग दिली आहे. अशा प्रशिक्षकांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
त्यांच्यासाठी हे मनोबल वाढवणारे असणार आहे. विजय शर्मा, मीराबाई चानू यांच्या प्रशिक्षकांना 10 लाख रुपये मिळणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
तसेच ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या राष्ट्रीय क्रीडा महासंघाला (एनएसएफ) प्रत्येकी 25 लाख रुपयांचा बोनस देण्याशिवाय 75 लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला आहे.
याशिवाय रौप्यपदक विजेत्यांना 40 लाख रुपये, तर कांस्यपदक जिंकणाऱ्यांना 25 लाखांचे रोख बक्षीस देणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक ऍथलीटला 1 लाख व पदक विजेत्या 30 लाख रुपये बक्षीस देणार आहे.