गंगाखेड : भाजपनं माजी मंत्री पंकजा मुंडे ( BJP Leaders Pankaja Munde ) यांना विधान परिषदेची ( Vidhan Parishad ) उमेदवारी नाकारल्यानंतर मुंडे समर्थकांकडून आता जाहीर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे मुंडे समर्थक सोशल मीडियावर भाजप नेत्यांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत. ( Munde Supporter Troll BJP )
इतकच नव्हे तर पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारण्याच्या निषेधार्थ गंगाखेड तालुक्यात ( Gangakhed Taluka ) पंकजाताई नाहीतर भाजपा नाही कमळ चिन्ह हद्दपार करणार अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर वायरल होताना पाहायला मिळत आहे त्यामुळे मुंडे समर्थक कमालीचे नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी आधीच विधान परिषदेवर संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करू असं वक्तव्य केलं होतं मात्र विधान परिषदेसाठी इच्छुक असूनही भाजप न मुंडे यांना चांगलाच दणका दिला आहे भाजपकडून आता पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात पंकजा मुंडे यांचं नाव नसल्याने मुंडे समर्थकांसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. ( Pankaja Munde looks forward to the Legislative Council )