ICC Rules Changes : 1 ऑक्टोबर 2022 पासून क्रिकेटमध्ये काही नवीन नियम लागू होणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) क्रिकेटच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. या नवीन नियमाने 2022 चा टी-20 विश्वचषक (T20 Worldcup) खेळवला जाणार आहे. कोरोना व्हायरसमुळे ICC ने बॉलवर थुंक लावण्यावर बंदी घातली होती. आता ही बंदी कायमची लागू झाली आहे. सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) नेतृत्वाखालील पुरुष क्रिकेट समितीच्या शिफारशी मंजूर झाल्यानंतर नियम बदलण्यात आले आहेत. ते खालील प्रकारे आहेत.
नियम पहिला : ICC च्या नव्या नियमानुसार आता टी-20 सारख्या ODI क्रिकेटमध्ये फलंदाजाला पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार राहावे लागणार आहे. टी-20 क्रिकेटमध्ये जेव्हा एखादी विकेट पडते तेव्हा फलंदाजाला पहिल्या चेंडूसाठी 90 सेकंदात तयार राहावे लागते. आता वनडे आणि कसोटीमध्ये ही 2 मिनिटांची वेळ असणार आहे. म्हणजे त्या वेळेत जर फलंदाज पहिला चेंडू खेळायला तयार नसेल तर त्याला बाद घोषित केले जाईल.
नियम दुसरा : जर एखादा फलंदाज झेलबाद झाला. तर नवीन फलंदाज स्ट्राइकवर येईल. दोन्ही फलंदाजांनी झेल घेण्याआधी क्रीज बदलली असली तरी पुढचा चेंडू नव्या फलंदाजाला खेळावा लागणार आहे.
नियम तिसरा : क्षेत्ररक्षणाच्या वेळी खेळाडूने जाणूनबुजून चुकीची हालचाल केल्यास दंड म्हणून फलंदाजाला पाच धावा दिल्या जातील. आधी या चेंडूला डेड बॉल म्हटले जायचे आणि फलंदाजाचा फटका रद्द केला जायचा.
नियम चौथा : जर एखादा चेंडू खेळपट्टीपासून दूर पडला, तर फलंदाजाला आता खेळपट्टीवर थांबावे लागणार आहे. जर फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर गेला तर अंपायर त्याला डेड बॉल देणार. जर कोणताही चेंडू फलंदाजाला खेळपट्टी सोडून शॉट खेळण्यास भाग पाडल त्या चेंडूला नो बॉल दिला जाईल.
नियम पाचवा : स्लो ओव्हर रेटचा नियम जानेवारी 2022 मध्ये T20 फॉरमॅटमध्ये लागू करण्यात आला होता, ज्यामध्ये स्लो ओव्हर रेटसाठी संघांना दंड आकारण्यात आला होता. आता हा नियम वनडेमध्येही लागू होणार आहे.