TOD Marathi

HDFC Bank घेणार 18 जूनच्या बैठकीत ‘हा’ निर्णय; गुंतवणूकदारांना होईल फायदा, मिळेल ‘इतका’ लाभांश

टिओडी मराठी, मुंबई, दि. 15 जून 2021 – एचडीएफसी बँकेने शुक्रवारी 18 जून रोजी त्यांच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे, असे सांगितले आहे. आता या बैठकीत ते 31 मार्च 2021 रोजी संपणार्‍या आर्थिक वर्षासाठी बँक लाभांश जाहीर करू शकते.

एचडीएफसी बँकेने सांगितले की, 22 एप्रिल 2021 रोजी रिझर्व्ह बँकेने बँकांच्या लाभांशाच्या वितरणासंदर्भात अधिसूचना जारी केलीय, हे लक्षात ठेवून लाभांश जाहीर करणार आहे.

RBI ने यंदा 22 एप्रिल रोजी बॅंकांना अधिसूचना जारी केली होती, ‘बँकांनी आर्थिक वर्ष 2021 साठी लाभांश देय रक्कम 50 टक्के मर्यादित करावी. कोरोना काळात काम करण्यासाठी भांडवलाची बचत करावी.’

तथापि, सहकारी बँकांना इक्विटी शेअर्स वरील नफ्यामधून लाभांश देण्यास सूट दिली आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये RBI ने बँकांना लाभांश वाटप करण्यास परवानगी दिलेली नाही. मागील वर्षी एप्रिलमध्ये लॉकडाउन सुरू झाल्यानंतर RBI ने हा निर्णय घेतलाय.

याबाबत एचडीएफसी बँकेने म्हटले आहे की, 15 जून 2021 ते 20 जून 2021 पर्यंत नियुक्त कर्मचारी आणि संचालकांच्या शेअर्सचे ट्रेडिंग बंद केले जातील जेणेकरून कोणताही इनसायडर ट्रेडिंग होऊ नये. एचडीएफसी बँकेचे शेअर्स दुपारी 12.13 वाजता 0.75 टक्क्यांनी वधारून 1490.55 रुपयांवर ट्रेड करीत आहेत.

जाणून घ्या, लाभांश म्हणजे काय?
काही कंपन्या त्यांच्या नफ्यातील काही भाग वेळोवेळी त्यांच्या भागधारकांना देतात. ते नफ्याचा हा भाग भागधारकांना लाभांश म्हणून देत असतात.

लाभांश जाहीर झाल्यानंतर रेकॉर्ड डेट जाहीर केली जाते. ही ती तारीख आहे ज्याला कंपनी आपल्या रेकॉर्ड बुकमध्ये हे पाहते. सध्या कंपनीच्या शेअर्सच्या कोणत्या गुंतवणूकदारांचे शेअर्स आहेत. म्हणजे लाभांशाची रक्कम रेकॉर्ड तारखेपर्यंत शेअर्स असलेल्या लोकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली जाते.

किती लाभांश द्यावा लागेल? हे कंपनीच्या वार्षिक बैठकीमध्ये निश्चित केले जाते. याला अंतिम लाभांश म्हणतात. जर कंपनी आर्थिक वर्षाच्या मध्यावर लाभांश देत असेल तर त्याला इंटरिम डिविडेंड किंवा अंतरिम लाभांश असे संबोधतात. जेव्हा आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनी नफा कमावते, तेव्हा अंतरिम लाभांश दिला जातो.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज