TOD Marathi

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मृणालताई गोरे दालनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई व अध्यक्षस्थानी बाबा आढाव यांची उपस्थिती होती. केशव गोरे स्मारक ट्रस्टच्यावीतने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘मृणालताई गोरे दालन, संघर्षाचा कलात्मक अविष्कार’ असं या कार्यक्रमपत्रिकेवर नमूद करण्यात आलं होतं.

शरद पवार यांनी मृणालताई गोरे यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाता अनेकांनी प्रचंड योगदान दिलं. त्या अनेकांपैकी काहींची आठवण ही प्रकर्षाने आपल्या सगळ्यांना होते, त्यात मृणालताईंचं नाव आल्याशिवाय राहणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

मृणालताई गोरे सदनात असताना अनेकवेळा वाद-विवाद व्हायचे पण ते हिताचे असायचे. त्यावेळी सुसंवाद पाहायला मिळायचा, तो आज पाहायला मिळत नाही. आता कोथळा काढायची भाषा केली जाते, अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली. पाठीमागून वार करण्याची शिवसेनेची परंपरा नाही. असं संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करताना, ‘कोथळा काढायला हातात जे शस्त्र घ्यायला लागते ते पेलवण्यासाठी विश्वासघातक्यांच्या दंडात ताकद आहे का? असा सवाल केला होता.