TOD Marathi

मुंबई : 

भारतीय राष्ट्रध्वज हे संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाचे प्रतीक आहे. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत केंद्रीय गृहमंत्र्यांनी ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाला मान्यता दिली आहे. याअंतर्गत सर्व भारतीयांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षी राष्ट्र म्हणून एकत्रितपणे ध्वज घरी आणणे हे केवळ तिरंग्याशी वैयक्तिक संबंधाचेच नव्हे तर राष्ट्र उभारणीसाठीच्या आपल्या वचनबद्धतेचेही प्रतीक आहे, ही भावना जागृत करणे, ही या उपक्रमामागील कल्पना आहे. लोकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे आणि आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे हा यामागील उद्देश आहे.

१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे. तसेच २ ऑगस्टपासून सोशल मीडियावरील प्रोफाईल फोटोला तिरंगा लावण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. (‘Har Ghar Tiranga’ campaign)

देशातील किमान २० कोटी घरांमध्ये तिरंगा पोहोचवणे हे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून केंद्र सरकार काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात २२ जुलै २०२२ रोजी ट्वीट केले. ट्वीटच्या माध्यमातून तिरंग्याशी संबंधित ऐतिहासिक माहितीसुद्धा दिली.

मोदी यांनी ट्वीट करून सांगितले की, “आज २२ जुलै आहे. या दिवसाचे देशाच्या इतिहासात महत्त्व आहे. कारण याच दिवशी भारताच्या संसदेने तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला. यानंतर आणखी एक ट्वीट करून मोदी यांनी तिरंगा हा देशाचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्याचा प्रस्ताव तयार करणाऱ्या समितीबाबतची ऐतिहासिक माहिती सांगणारी कागदपत्रे शेअर केली”.

या मोहिमेत कसे सहभागी व्हाल ?

ज्यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाती आहेत ते त्यांचे प्रोफाइल चित्र तिरंग्यामध्ये बदलून सहभागी होऊ शकतात. पुढे, हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत नागरिकांना भारतीय ध्वज संहितेच्या नियमांनुसार राष्ट्रध्वज फडकावावा लागतो. ध्वजसंहिता हा राष्ट्रध्वजाचे उत्पादन, ध्वजारोहण आणि गरज भासल्यास त्याची विल्हेवाट लावण्याशी संबंधित असलेल्या नियम आणि नियमांचा संच आहे.

अशी करायची नोंदणी ?

या मोहिमेसाठी https://harghartiranga.com/ हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर जाऊन pin a flag पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Social Login / Fill in your details यावर क्लिक करून मग Allow your location access करावे. त्यानंतर आपल्या लोकेशनवर ऑनलाइन तिरंगा फडकवावा.

या संकेतस्थळावर तिरंग्यासोबतचा सेल्फी अपलोड करता येणार आहे. या मोहिमेत सहभागी झाल्याचे प्रमाणपत्रही तुम्हाला ऑनलाइन डाऊनलोड करता येईल.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज