टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 15 जुलै 2021 – फेसबुक युजर्ससाठी फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी बुधवारी एक खुशखबर दिलीय. फेसबुक 2022 च्या अखेर पर्यंत क्रिएटर्सना 1 बिलियन डॉलरचे पेमेंट करण्यासाठी एका कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. फेसबुकवर युजर्सना आकर्षित करण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेतला आहे.
सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुकने असे म्हटलं आहे की, सर्व क्रिकेटर्समध्ये या 1 बिलियन डॉलरचे वाटप केले जाणार आहे. ज्यामुळे इन्फ्लूएन्सर्सना फेसबुकवर मूळ किंवा ओरिजिनल कंटेट तयार करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. इन्फ्लूएन्सर्स फेसबुक व इन्स्टाग्रामची वैशिष्ट्ये वापरुन पैसे कमवण्यास सक्षम होऊ, शकतील.
हि आहे क्रिएटर्ससाठी खास योजना :
मागील एका वर्षात टेक कंपन्यांत मोठं वॉर सुरूय. हे प्रत्येक प्लॅटफॉर्म त्यांच्या युजर्सना खास करुन कंटेट क्रिएटर्सना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताहेत. यात टिकटॉक व यूट्यूबसारख्या कंपन्यांचा ही समावेश आहे.
फेसबुकने वर्षअखेर पर्यंत इन्स्टाग्राम व फेसबुकवर त्याचा बोनस ट्रॅक करण्यासाठी क्रिएटरसाठी एक खास जागा देण्याची योजना आखली आहे, असं फेसबुकने म्हटलं आहे.
जाणून घ्या फेसबुकची योजना :
फेसबुकने त्यांचे प्रोडक्ट्स वापरण्याच्या बदल्यामध्ये क्रिएटर्सना पैसे देण्याची ही पहिली वेळ नाही. कंपनीने IGTV, YouTube सारखे मोठ्या फॉर्ममधील व्हिडीओ आणि रीलसारखी सुविधा ही सुरू केलीय. जी टिकटॉकप्रमाणे काम करत आहे.
डिसेंबरमध्ये, फेसबुकने ब्लॅक गेमिंग समुदायात पुढील दोन वर्षांत 10 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे, असे आश्वासन दिले होते. नोव्हेंबरमध्ये स्नॅपचॅटने स्पॉटलाइट फीचरवर पोस्ट करणाऱ्या कंटेट क्रिएटर्सना दररोज 1 मिलियन डॉलर देण्यास सुरुवात केली होती.