टिओडी मराठी, दि. 8 ऑगस्ट 2021 – नॉर्थ सेंट्रल रेल्वेमध्ये अप्रेंटिसच्या 1664 रिक्त जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
यासाठी नोकर भरतीसाठी नोटीफिकेशन जारी केली असून अर्ज मागविलेत. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 02 ऑगस्टपासून सुरू झालीय. जे उमेदवार रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप करण्यासाठी इच्छुक आहेत.
तसेच त्यांनी मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट www.rrcpryj.org ला भेट द्यावी, तसेच काळजीपूर्वक जाहिरात वाचावी. त्यानंतर इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
प्रयागराज, झाशी आणि आगर विभागामध्ये उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यासाठी नेमलेल्या रिक्त पदांच्या संख्येची माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे. फिटर, वेल्डर, विंडर, मशिनिस्ट, सुतार, इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक आणि वायरमन या ट्रेडमध्ये उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक –
या भरती मोहिमेद्वारे एकूण 1664 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 02 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2021 अशी आहे.
आवश्यक पात्रता आणि निवड –
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. वेल्डर, वायरमन आणि सुतार व्यापारासाठी 8 वी पास अर्ज करण्यास पात्र आहेत. परीक्षा न घेता केवळ गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अशी आहे फी –
यातील अनारक्षित कॅटगरीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे, तर आरक्षित कॅटगरीतील उमेदवारांसाठी अर्ज निशुल्क आहे.
इच्छुक उमेदवार www.rrcpryj.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोटिफिकेशनमधील सर्व माहिती तपासू शकतात. तसेच दिलेल्या शेवटच्या तारखेपूर्वी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करु शकतात.