टिओडी मराठी, दि. 26 जून 2021 – अमेरिकेतील वंशद्वेषाचा बळी ठरलेल्या जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीला अखेर न्याय मिळाला. डेरेक शॉविन हा पोलिस आधिकारी दोषी आढळला असून त्याला जॉर्ज फ्लॉइड याच्या हत्येप्रकरणी 22 वर्ष सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
वर्षभरापूर्वी जॉर्ज फ्लॉइड यांचा पोलिसांच्या अत्याचारामध्ये मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेसह जगात ‘ब्लॅक लाइव्हज् मॅटर’ ही चळवळ पसरली होती. हा अत्याचार वंशद्वेषातून झाल्याचेही उघड झाले होते. दोषी आढळल्यानंतर न्यायालयाने डेरेक शॉविन याला शिक्षा सुनावली.
संघराज्यातील नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून फ्लॉइड कुटुंबाने मिनिया पोलिस प्रशासनाविरोधात मागील वर्षी जुलै महिन्यात खटला दाखल केला होता. याचिकार्त्यांनी शॉविन याला 30 वर्षाच्या शिक्षेची मागणी केली होती. मात्र, याधीही तो कोणत्याही गुन्ह्यात आरोपी असल्याचा रेकॉर्ड नाही. त्यामुळे न्यायाधीश यांनी त्याला 22 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
17 वर्षांच्या ड्रॅनेला फ्रेझर या मुलीने जे घडलं ते मोबाइलवर चित्रित केलं व समाजमाध्यमांमुळे ते झटक्यात घराघरात पोहचलं. यात मी वाईट माणूस नाही, मला मारू नका, माझं प्रेम आहे, असं माझ्या मुलांना सांगा. हेच तो पुन्हा पुन्हा पोलिसांना सांगत होता, असे त्यात दिसत आहे.
मागील वर्षी २५ मे रोजी जॉर्ज फ्लॉईडच्या मानेवर सुमारे ९ मिनिटे पोलिस अधिकारी डेरिकने दाब दिल्याने मरण पावला होता. वीस डॉलरची खोटी नोट दुकानात जॉर्जने दिल्यावर दुकानातल्या कुणीतरी पोलिसांना फोन केला आणि त्यानंतर हे घडलं.
जॉर्जच्या मानेवर गुडघ्याचा दाब देऊन पोलिस अधिकारी डेरिक बसलेला असताना तिथे असलेली माणसं जॉर्जला सोडून द्या, अशी विनंती करत होती. त्याला श्वास घेणं कठीण झालंय, त्याचा जीव जाईल, असे आकांताने ओरडून सांगत होती. ‘मला श्वास घेता येत नाही, मला मारू नका,’ हेच जॉर्जचे अखेरचे शब्द होते.