वाढत्या इंधनदराच्या संदर्भात गडकारींचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Flex Fuel - Nitin Gadkari - TOD Marathi

मुंबई: वाढत्या इंधनदरांमुळे सर्वसामान्य चिंतेत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यात देशातील वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्युएल इंजिन अनिवार्य केलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. वाहन उत्पादकांना फ्लेक्स-फ्युएल इंजिन तयार करण्यास सांगणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

फ्लेक्स-फ्युएल इंजिन हे इथेनॉल, सीएनजी आणि बायो सीएनजी या पर्यायांवर चालणारं असेल. पुढील १५ वर्षात भारतीय वाहन उद्योगाचं मूल्य १५ लाख कोटी इतकं असेल असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. सर्व वाहन उत्पादकांना फ्लेक्स फ्युएल इंजिन अनिवार्य केलं जाईल असं सांगताना नितीन गडकरी यांनी यामुळे वाहनांच्या किंमती वाढणार नाहीत असा दावा केला आहे. तसंच येणाऱ्या काही दिवसांत भारत ग्रीन हायड्रोजनची निर्यात करेल असंही ते म्हणाले आहेत.

फ्लेक्स फ्युएल इंजिनाच्या निर्मितीची परवानगी देण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा विचार करत होतो. पण आता सर्व वाहन उत्पादकांनाच पुढील सहा ते आठ महिन्यात फ्लेक्स फ्युएल इंजिन (एकापेक्षा जास्त इंधनावर चालणारे) तयार करण्यासाठी सांगितलं पाहिजे असं वाटत आहे, असं गडकरी म्हणाले.

Please follow and like us: