लाल सिंग चढ्ढा रिलिज होण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक राहिले असताना त्याच्यावरुन सुरु झालेला वाद काही संपण्याचे नाव घ्यायला तयार नाही. करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये आमिर आणि (Boycott Laal Singh chaddha) करिनानं मॅरेथॉन मुलाखत दिली आणि वेगवेगळ्या प्रकारचे वाद, आणि गोष्टी समोर आल्या आहेत. त्याचा परिणाम आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढावर होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमिर खानचा लाल सिंग चढ्ढा चित्रपट हा नेटकऱ्यांच्या रागाचे कारण ठरतो आहे. काहींनी बॉलीवूड चित्रपटांवर बहिष्कार घाला तर काहींनी थेट आमिरच्या लाल सिंग चढ्ढावर बहिष्कार अशी मागणी सुरु केली आहे. दुसरीकडे सेलिब्रेटींनी मात्र प्रेक्षकांनी आपली कलाकृती एकदा पाहावी असं आवाहन केलं आहे.
आता लाल सिंग चढ्ढाच्या निमित्तानं दुसराच वाद समोर आला आहे. तो (forest gump vs laal singh chaddha) म्हणजे फॉरेस्ट गंपच्या चाहत्यांनी आमिरच्या लाल सिंग चढ्ढाला विरोध दर्शवला आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन त्यांनी निषेध नोंदवला आहे. 11 ऑगस्टला ‘लाल सिंग चढ्ढा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना आमिरच्या या चित्रपटाची मोठी उत्सुकता लागली आहे. त्यात करिना कपूर, नागा चैतन्य यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता फॉरेस्ट गंपचे निर्माते यांनीही त्यांच्या ट्विटरवरुन लाल सिंग चढ़्ढाचे प्रमोशन सुरु केले आहे. त्यामुळे फॉरेस्ट गंपचे चाहते हे दुखावले आहेत. चाहत्यांनी या दोन्ही चित्रपटांची तुलना सुरु केली आहे. आम्हाला आमचाच फॉरेस्ट गंप हवा आहे. जो अस्सल आहे, असं म्हणत आहेत.