पुणे: पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचा शैक्षणिक वारसा खूप जुना आणि प्रसिद्ध आहे. या परिसरामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयासोबतच बीएमसीसी, एमएमसीसी आणि गोखले इन्स्टिट्यूट यांसारखी अनेक महाविद्यालये आहेत. गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढल्याच दिसून येत आहे. कोरोना काळात महाविद्यालये पूर्णपणे बंद असून सध्या एक धक्कादायक आकडेवारी समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. फर्ग्युसन मैदान ते फर्ग्युसन टेकडी परिसरात गेल्या महिन्याभरात तब्बल आठशेहुन अधिक दारूच्या बाटल्या सापडल्याची माहिती पुणे प्लॉग्गेर्स या संस्थेने दिली आहे.
मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये ५०० बाटल्या आणि ह्या जानेवारी महिन्यामध्ये तब्बल ३५० बाटल्या सापडल्या आहेत. ह्या सर्व बाटल्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारत सापडल्याचे दिसून आले आहे. बाटल्यांसह २५० किलो प्लास्टिक कचरा सुद्धा जमा करण्यात आहे. ग्राउंड ते फर्ग्युसन टेकडी परिसरात गेल्या एका महिन्यात या बाटल्या सापडल्या आहेत.
काय काम करते प्लॉग्गेर्स संस्था ?
२०१९ पासून पुणे शहरातील कचरा साफ करण्याची मोहीम दर शनिवार आणि रविवारी पुणे प्लॉग्गेर्स या संस्थेतर्फे राबाण्यात येते.
पुण्यातील नदी काठी, प्रमुख रस्ते, गर्दीचे ठिकाण, महाविद्यालय अश्या सर्व ठिकाणचे साफ सफाईचे काम या संस्थेमार्फत केलं जात आहे. जमा केलेला कचरा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. कचऱ्यातील बाटल्यानपासून टाकाऊ मधून टिकाऊ अश्या कलात्मक वस्तू तयार केल्या जातात. या वस्तूंमध्ये प्रामुख्याने शोभेचे दिवे, फुलदाणी बनवले जाते.