हिंदुहॄदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांनी काँग्रेसवर टीका केली आणि तुम्ही काँग्रेस सोबत जात आहात म्हणून आम्ही दूर गेलो असे गद्दार म्हणतात. मात्र, एवढ्या वर्षात सत्तेत असलेल्या काँग्रेसनेही कधी शिवाजी पार्क मैदान (Shivaji Park Ground) शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला (Dasara Melava) देताना विरोध केला नाही, असं जबरदस्त प्रत्युत्तर शिवसेना नेते भास्कर जाधव (Shivsena leader Bhaskar Jadhav)यांनी शिवसेनेतून फुटलेल्या नेत्यांना लगावला.
गेल्या अनेक वर्ष शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) शिवाजी पार्क मैदानावर होतो. यादरम्यान काही वर्ष काँग्रेसची राज्यात सत्ता होती, असा असतानाही काँग्रेसने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान (Shivaji Park Ground) मिळण्यासाठी आडकाठी आणली नाही, याचा दाखला भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी दिला. याउलट आम्हाला शिवाजी पार्क मैदान मिळत असताना तुम्ही जाणीवपूर्वक कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला.
अपेक्षेप्रमाणे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिंदे गटातील (Eknath Shinde) नेत्यांवर जोरदार प्रहार केले. त्यासोबतच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर देखील टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत सैनिक म्हणून घेताना बाळासाहेबांनी जेव्हा सांगितलं, की ‘माझ्यानंतर उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा’ तो संदेश तुम्ही विसरलात असाही उल्लेख केला.