तुम्हाला शिवाजी पार्कवर उभं राहण्याचा नैतिक अधिकार तरी उरला आहे का?
मैदान मिळालं नाही तरी बाळासाहेबांचा विचार आमच्यासोबत.
तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना मूठ माती दिली.
शिवाजी पार्क मैदानही आम्हाला मिळालं असतं.
बाळासाहेब आणि ज्यांना विरोध केला त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली होती.
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली होती.
आम्ही जर बेईमानी केली असती तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या सोबत असतात का?
बाळासाहेबांचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीकडे देऊन आम्हालाही त्यांच्या तालावर नाचवलं.
ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची, ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची.
राज्यात सर्वत्र पाठिंबा मिळतोय.
ही सभा बघून अनेकांच्या मनातला संभ्रम दूर झाला असेल.
आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व हे महत्त्वाचे.
व्यासपीठावर आणि व्यासपीठांसमोर फक्त बाळासाहेबांचे सैनिक आहेत.
आम्ही जे केलं ते राज्याच्या हितासाठी.
गद्दार आणि खोके शिवाय तिसरा शब्द नाही.
निवडणुकीनंतर केलेली तडजोड ही गद्दारी.
आम्ही गद्दार नाही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत हे अभिमानाने सांगतो
आम्हाला म्हणता बाप चोरता, तुम्ही तर बापाचे विचार विकले, बाप विकला….
25 वर्ष युतीत सडली हे जाहीरपणे सांगताना तुम्हाला काहीच वाटलं नाही?
याकुबची फाशी रद्द करणाऱ्या आमदाराला मंत्रिपद दिलं.
मुंबईकरांना आणखी किती जखमा देणार?
जनतेनं ठरवलंय की गद्दारांना नाही तर आम्हाला साथ द्यायची.
महाराष्ट्रातली जनता तुम्हाला माफ करणार नाही.
सगळया आमदार- खासदारांना मीच भेटायचो, बाकी कोणी भेटत नव्हते.
महाविकास आघाडीतले पक्ष शिवसेना संपवायला निघाले होते.
चार-पाच वेळा मी ठाकरेंना राष्ट्रवादीबाबत सांगितलं.
पराभूत उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादीची नेतेमंडळी ताकद द्यायची.
तुम्ही टाहो फोडण्यापेक्षा आत्मपरिक्षण करा.
बारा खासदार 40 आमदारांनी तुम्हाला का सोडलं? याचा विचार करा.
जगातील 33 देशांनी आमच्या उठावाची दखल घेतली.
एकनाथ शिंदेला जीवाची पर्वा नाही, जनतेसाठी अखंड काम करत राहील.
इंग्रजांविरोधात केलेला उठाव देखील क्रांती होती.
तुम्ही अडीच वर्षात किती वेळ मंत्रालयात गेलात?
तुमचा कारभार कुणालाच आवडत नव्हता.
राज्यात दुकान बंद केली, मंदिर बंद केली मात्र तुमची दुकानं सुरू ठेवली.
आघाडीचं सरकार टिकवण्यासाठी आमच्या नेतृत्वाला हिंदुत्व सोडावं लागलं.
बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणताना तुमची जीभ कचरत होती.
या देशाच्या उभारणीमध्ये आरएसएसचं मोठं योगदान आहे.
ही काही तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. शिवसैनिकाच्या कष्टातून, घामातून उभी राहिलेली शिवसेना आहे.
पक्ष हवालदील झाला मात्र पक्ष नेतृत्व ‘संजय’ सांगेल तेवढेच ऐकत होते.
फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचं का?
तिकडे पक्ष आहे पण अध्यक्ष नाही, इकडे अध्यक्ष आहे पण पक्ष नाही.
मोदींची भुरळ जगाला आहे, बाळासाहेबांचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं
राज्यातही पीएफआयला ठेचलं जाईल
आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा
याकूबचा हस्तक होण्यापेक्षा मोदी-शहांचा हस्तक असण्याचा मला सार्थ अभिमान आहे.