TOD Marathi

खाद्यतेल आणखी स्वस्त होणार ; सरकारने आयात शुल्क केले कमी, गृहिणींना दिलासा मिळणार

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 18 जून 2021 – पेट्रोल- डिझेलप्रमाणे खाद्यतेलाचे दर देखील गगनाला भिडले होते. त्यामुळे गृहिणींच बजेट कोलमडलं होतं. आता सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्कामध्ये मोठी घट केलीय. त्यामुळे आगामी काळात खाद्यतेलाचे दर आणखी कमी होणार आहे. हाच गृहिणींना दिलासा म्हणावा लागेल.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेत असं म्हंटलं आहे की, खाद्यतेलावरील आयात शुल्क प्रति टनाला 112 डॉलरपर्यंत कमी केले आहे. या सूचनेची अंमलबजावणी लगेच सुरू केली आहे.

भारतातील खाद्य तेलाचे उत्पादन गरजेपेक्षा कितीतरी कमी असल्यामुळे भारताला खाद्यतेल आयात करावे लागते. मात्र, आयात खाद्यतेलावर अधिक प्रमाणात आयात शुल्क असल्यामुळे मागील काही महिन्यापासून खाद्य तेलाच्या किमती वाढल्या. मात्र, केंद्र सरकारने आज घेतलेल्या या निर्णयामुळे खाद्य तेलाच्या किमती कमी होण्यास मदत होणारआहेत, असेही खाद्यतेलाच्या आयातदार संघटनेने म्हटले आहे.

एक वर्षांत खाद्य तेलाचे दर सुमारे दुपटीने वाढलेत. केंद्र सरकारने मागील आठवड्यात सांगितले होते की, खाद्यतेलाचे दर कमी होत आहेत. सरकार मध्यम, लघू आणि दीर्घ पल्ल्याच्या उपायोजना करून खाद्यतेलाचे दर आवाक्‍यात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकारने गळीत धान्याचे उत्पादन वाढावे, यासाठी बऱ्याच उपाययोजना केलेल्यात.

आधारभूत किमतीच्या दरातही मोठी वाढ केली आहे. त्यामुळे आगामी काळात देश खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल, असे सरकारला वाटते.