येस बँक DHFL फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई करत ईडीने संजय छाब्रिया आणि अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची मालमत्ता जप्त केली आहे. ED ने संजय छाब्रिया (Sanjay Chabria) यांची 251 कोटी रुपये आणि अविनाश भोसले यांची 164 कोटी रुपये जप्त केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (PMLA) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी रेडियस डेव्हलपर्सचे संजय छाब्रिया आणि एबीआयएल इन्फ्रास्ट्रक्चरचे अविनाश भोसले यांना अटकही करण्यात आली आहे.
ED has provisionally attached assets worth Rs 251 crores of Sanjay Chhabria and assets worth Rs 164 crores of Avinash Bhosale, in Yes Bank- DHFL fraud case under PMLA, 2002. Total attachment in the case stands at Rs 1,827 crores: Enforcement Directorate pic.twitter.com/QReDUOnw87
— ANI (@ANI) August 3, 2022
संजय छाब्रिया यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील सांताक्रूझ येथील 116.5 कोटी रुपयांच्या जमिनीचा समावेश आहे. याशिवाय सांताक्रूझ येथे असलेला 3 कोटी रुपयांचा फ्लॅट, दिल्ली विमानतळावर असलेल्या छाब्रियाच्या हॉटेलमधून 13.67 कोटी रुपयांचा नफा आणि 3.10 कोटी रुपयांच्या तीन लक्झरी कारचाही समावेश आहे. त्याचवेळी अविनाश भोसले यांच्याकडे मुंबईत 102.8 कोटी रुपयांचा डुप्लेक्स फ्लॅट आहे. याशिवाय पुण्यातील 14.65 आणि 26.24 कोटी रुपयांची जमीन, नागपुरातील 15.52 कोटी रुपयांची आणि 1.45 कोटी रुपयांची आणखी एक जमीन जप्त करण्यात आली आहे.
सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने येस बँकेचे राणा कपूर आणि DHFL चे कपिल वाधवन, धीरज वाधवन प्रवर्तकांच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे. राणा कपूरने M/s DHFL चे संचालक कपिल वाधवन आणि इतरांसोबत M/s DHFL ला येस बँक लिमिटेडद्वारे आर्थिक सहाय्य देण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे.
डीएचएफएलशी संबंधित 34,615 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी नुकतेच केंद्रीय अन्वेषण विभागाने पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले यांच्या परिसरातून ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर जप्त केले होते. 2011 मध्ये वर्वा एव्हिएशननेचे AW109AP हे हेलिकॉप्टर 36 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप आहे. वर्वा आशियाईचा मालकी हक्क असोसिएशन ऑफ पर्संसकडे आहे.