TOD Marathi

गेली काही दिवस सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे. झी मराठी वाहिनीवर येणाऱ्या ‘बस बाई बस’ या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होणार असून या महिला कलाकारांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जात आहेत. अशी भन्नाट संकल्पना असणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) करत आहे. या कार्यक्रमात या आधी खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सहभागी होणार आहेत. याचा एक प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये अमृता फडवणीस यांना थेट ‘मामी’ या विशेषणावरुन प्रश्न विचारण्यात आला. हा विडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे. (Amruta Fadanvis In Bas Bai Bas Show On Zee Marathi)
अमृता फडणवीस यांनी या कार्यक्रमात दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. अमृता फडणवीस त्यांच्या विधानांमुळे बऱ्याचदा चर्चेत असतात. त्यांना ट्रोलही केलं जातं. याच ट्रॉलर्सने अमृता फडणवीस यांना ‘मामी’ असे विशेषण दिले आहे. त्याच संदर्भात एका महिलेने प्रश्न विचारला. ‘देवेंद्र फडणवीस यांना ‘माजी मुख्यमंत्री’ म्हणजे ‘मामु’ असं म्हटलं जातं तर तुम्हाला ‘मामी’ म्हणतात तर तुम्हाला कसं वाटतं’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या, ‘मला तर फार मजा येते,’ त्यांचं हे उत्तर ऐकून सर्वच जन चकित होतात. (Amruta Fadanvis Reacts On Mami)
पुढे त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवून संवाद साधायला सांगितले जाते. त्यावेळी त्या म्हणतात, ‘अरे वा! आज वेळ मिळाला वाटतं. कुठे? आसामला नेताय का?’ असे त्या म्हणतात. यावेळी सर्वजन हसू लागतात. त्यामुळे अमृता फडणवीस यांची ही मुलाखत स्पेशल असणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अमृता फडणवीस गाणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.