टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 15 मे 2021 – कोरोनामुळे मोठ्या कंपन्यांत हि प्रमोशन, पगारवाढ थांबवली आहे. मात्र, एक असं क्षेत्र आहे, जिथे कोरोनातही कर्मचाऱ्यांचा पगार वाढला आहे. कोरोना असताना हि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. हे स्पर्धेत टिकून राहणे आणि मार्केटमधील प्रतिभा टिकवून ठेवण्यासाठी सुरु आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात दुप्पट वाढ झालीय.
मागील वर्षभराहून अधिक काळ देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झालीय. रुग्णांचा आकडा हा सुमारे दोन कोटींवर पोहोचला असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसलाय. तसेच काहींच्या नोकऱ्या हि गेल्या. बहुतांश क्षेत्रात पगाराच्या वाढीच्या उलट कर्मचार्यांच्या पगारात कपात केली आहे.
एक्सेंचर इंडिया :
सध्या एक्सेंचर इंडियात 2 लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. मागील वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, बोनस व प्रमोशन दिलं होतं. यंदा फेब्रुवारीत वाढ आणि पदोन्नतीची प्रक्रिया सुरूय.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, यंदा एप्रिलमध्ये त्यांच्या कर्मचार्यांना ‘थँक यू’ बोनस मिळाला आहे. कंपनीने 605 कर्मचार्यांना व्यवस्थापकीय संचालक पदावर पदोन्नती दिली, त्यातील 63 पदांवर वरिष्ठ एमडी पदावर पदोन्नती झालीय.
टीसीएस :
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ने 6 महिन्यांच्या कालावधीत कर्मचार्यांच्या पगारात दोनदा वाढ केलीय. कंपनीने एप्रिल 2021 पासून आपल्या सर्व कर्मचार्यांना सुधारित वेतन देणे सुरू केलं आहे.
टेक महिंद्रा :
आयटी क्षेत्रातील कंपनी टेक महिंद्राने कर्मचार्यांच्या वेतनात वाढ करण्याची घोषणा केलीय. ती 1 एप्रिल 2021 पासून अंमलात आली आहे. कंपनीने आपल्या हुशार कर्मचाऱ्यांना रिटेंशन बोनसही जाहीर केलाय.
इन्फोसिस :
देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसने कर्मचाऱ्यांच्या भरपाईची समीक्षा दुसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेत आहे. कंपनीने जानेवारी 2021 पासून आपल्या कर्मचार्यांच्या पगारात वाढ केली. मागील वर्षी कंपनीने आपल्या बर्याच कर्मचाऱ्यांची वाढ थांबवली होती.