टिओडी मराठी, पुणे, दि. 17 ऑगस्ट 2021 – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसके यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. नाईक यांनी जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे कुलकर्णी यांना दिलासा मिळाला आहे.
हेंमती साडेतीन वर्षांपासून तुरुंगामध्ये आहेत. त्यांना जितकी शिक्षा होऊ शकते. त्यापेक्षा अर्धी शिक्षा भोगलेली आहे. त्यांचे वय आणि करोना स्थितीचा विचार करत हेंमती यांना जामीन दिला जावा, असा युक्तिवाद अॅड. आशुषोष श्रीवास्तव यांनी केला. तो युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने यावर निकाल दिला आहे.
या प्रकरणामध्ये डीएसके यांच्यासह पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, बंधू मकरंद कुलकर्णी, पुतणी, जावई यांच्यासह इतर अनेकांना अटक केली आहे. त्यांच्यावर एमपीआयडी, फसवणूकसह विविध कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
डीएसके आणि हेमंती कुलकर्णी यांना फेब्रुवारी 2018 साली या गुन्ह्यात अटक केली होती. तेव्हापासून दोघेही सुरुवातील पोलीस आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. कुलकर्णी दांपत्यावर दोषारोपपत्र दाखल केले आहे.
डीएसके यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांच्यासह काहींना या प्रकरणामध्ये जामीन मंजूर केला आहे. तर, डीएसके दांपत्यांचा जामीन नाकारला होता. शिरीष कुलकर्णी यांनी त्याचे वकील आशिष पाटणकर आणि अॅड. प्रतीक राजोपाध्ये यांच्या मार्फत सत्र न्यायालयामध्ये जामिनाचा अर्ज दाखल केला होता . त्यानंतर हेमंती यांनी अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांच्यामार्फत उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता.