एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. (Eknath Shinde had given Z Security) त्यांना आलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर त्यांची अधिक काळजी घेण्याची सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सध्या जी चर्चा सुरू आहे किंवा शिंदे गटाकडून आरोप करण्यात आलेले आहेत ते निरर्थक आहेत असं स्पष्टीकरण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी देखील एकनाथ शिंदे यांना आवश्यक ती सर्व सुरक्षा दिल्याचं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांकडून एकनाथ शिंदे यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवल्या नसल्याचं भाष्य केल्या गेलं होतं. यावर आता महाविकास आघाडी सरकारममधील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, (Shambhuraj Desai) शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी विद्यमान मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात आवश्यक ती सुरक्षा देण्यात आली नसल्याचा म्हटलं होतं. एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री पदावर दिलीप वळसे पाटील होते, त्यामुळे त्यांनी स्वतः या विषयावर स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असेही सांगितले आहे.