TOD Marathi

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. आणि या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या वडिलांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा माझ्या वडिलांनाही संपवण्याची सुपारी दिली गेली, असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुखांवर नितेश राणे यांनी केलेला आहे. (MLA Nitesh Rane tweeted)

“एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याप्रमाणेच नारायण राणे (Narayan Rane) यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना ठार मारण्यासाठी शिवसेनेच्या सो कॉल्ड, सभ्य आणि सोज्वळ पक्षप्रमुखांनी सुपाऱ्या दिल्या होत्या, सध्या सुरू असलेली म्याव म्याव संपू दे मग आम्ही वस्त्रहरणाला सुरुवात करू.”

असं नितेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. यामध्ये नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांचं थेट नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख कुणाच्या दिशेने आहे हे स्पष्ट आहे.

या ट्वीट मध्येच ‘सध्या सुरू असलेली म्याव म्याव संपू दे, मग आम्ही वस्त्रहरणाला सुरुवात करू’ असं म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना देखील डिवचलं आहे.  मध्यंतरी अधिवेशनादरम्यान आदित्य ठाकरे विधिमंडळात जात असताना त्याठिकाणी पायऱ्यांवर बसलेल्या नितेश राणे यांन ‘म्याव-म्याव’ आवाज काढून आदित्य ठाकरे यांना चिडवले होते. यावरून बराच वादंगही निर्माण झाला होता. (BJP MLA Nitesh Rane slams Shivsena chief Uddhav Thackeray)

नितेश राणे यांच्या या ट्वीटनंतर शिवसेनेच्या (Shivsena) वतीने काय प्रतिक्रिया येते, हे पहावे लागेल. नितेश राणे यांच्या या ट्विटच्या निमित्ताने आता ठाकरे विरुद्ध राणे वाद रंगण्याची शक्यता आहे. सध्या आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या (Aaditya Thackeray on Shiv Sanvad Yatra daura) निमित्ताने राज्यभरात दौरा करत आहेत. आज ते औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. आदित्य ठाकरे या दौऱ्यादरम्यान शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. त्याचबरोबर पक्ष म्हणून, सरकार म्हणून आम्ही या आमदारांना काहीही कमी केलं नसल्याचे ते सांगत आहेत.