टिओडी मराठी, नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2021 – इतर देशाप्रमाणे आता भारतातही डिसेंबरपर्यंत डिजिटल चलन सुरू करणार आहे,असे भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे रुपया बंद होईल का?, असा प्रश्न निर्माण होत आहे. मुळात डिजिटल चलन म्हणजे काय? तसेच डिजिटल चलन क्रिप्टोकरन्सीपेक्षा कसे वेगळे आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
सेंट्रल बँक डिजिटल करन्सी अर्थात CBDC हे रोख रकमेचे इलेक्ट्रॉनिक रूप आहे. या डिजिटल चलनाचे पूर्ण नाव सेंट्रल बँक डिजिटल करन्सी असे असून याचा अर्थ, तुम्ही जसे रोख व्यवहार करता त्याचप्रमाणे तुम्ही डिजिटल चलन व्यवहार हि करू शकाल.
हे देशाची सेंट्रल बँक जारी करीत असून ते त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या ताळेबंदामध्ये समाविष्ट होते. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते देशाच्या सार्वभौम चलनामध्ये रूपांतरित केले जाऊ शकते. भारतात याला डिजिटल रुपया म्हंटले जाईल.
डिजिटल चलनाचे दोन प्रकार असून एक किरकोळ (रिटेल) आणि दुसरा घाऊक (होलसेल). रिटेल डिजिटल चलनाच्या स्वरूपात असणार आहे. तर होलसेल डिजिटल चलन वित्तीय संस्थांद्वारे वापरले जाणार आहे.
डिजिटल चलन आणि क्रिप्टोकरन्सी यात मोठा फरक आहे. डिजिटल चलनाला देशाच्या सरकारने मान्यता दिलीय . त्यामुळे यात कोणताही धोका नाही. त्याचे सार्वभौम चलन म्हणजेच त्या देशाच्या चलनात रूपांतर करता येते. मात्र, क्रिप्टोकरन्सीसाठी ही सुविधा उपलब्ध नाही.
चीन, जपान आणि स्वीडनमध्ये डिजिटल चलनावर चाचणी सुरू झालीय. तर युके, अमेरिका ही डिजिटल चलन आणण्याच्या विचारात असून इक्वेडोर, बहामास, ट्युनिशिया, सेनेगलमध्ये डिजिटल चलन वापरले जात आहे.