TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, 29 ऑगस्ट 2021 – अमली पदार्थ विरोधी नियंत्रण कक्षाने बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन चव्हाट्यावर आलं आहे. त्यामुळे या बॉलिवूडवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करून कारवाईचा बडगा उगारला. यात आता बिग बॉसचा फेम अभिनेता ‘अरमान कोहली’ याला अटक केली आहे.

शनिवारी (दि. 28) अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकला. तसेच त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यावेळी रात्री उशिरापर्यंत अररमान कोहलीची चौकशी केली. एनसीबीला मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये ड्रग्जबद्दल बरीच माहिती मिळाली होती.

त्यानंतर एनसीबीने एक ऑपरेशन सुरू केलं आणि त्याला ‘रोलिंग थंडर’ असं नाव दिलं आहे. याच रोलींग थंडर अंतर्गत अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकला.

एनसीबीकडून आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी केली आहे. त्यामुळे आता अरमान कोहलीनंतर आणखी किती महत्त्वपूर्ण माहिती समोर येणार आहे, पाहणे गरजेचं आहे.

अरमान कोहली याने ‘बिग बॉस या लोकप्रिय शोमध्येही भाग घेतला होता. बेकायदा दारुसाठा केल्याप्रकरणी त्याला याअगोदर अटक केली आहे. 2018 मध्ये अरमान कोहलीवर त्याची लिव्ह इन गर्लफ्रेंड नीरू रंधावा हिला बेदम मारहाण केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळीही त्याला अटक केली होती.