TOD Marathi

‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ ( Dhondi Champya – Ek Prem Katha ) . हे नाव ऐकूनच खदखदून हसायला येणाऱ्या चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर झळकला असून हा एक धमाल विनोदी चित्रपट दिसतोय. एक आगळीवेगळी प्रेमकहाणी असणाऱ्या या चित्रपटात भरत जाधव ( Bharat Jadhav ), वैभव मांगले ( Vaibhav Mangle ) , सायली पाटील ( Sayli Patil ) , निखिल चव्हाण ( Nikhil Chavan ) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर यांचे असून प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ची निर्मिती करण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत.

ही प्रेमकथा धोंडी आणि चंप्याची आहे, हे आपल्याला यापूर्वीच कळले आहे. आता या प्रेमकहाणीत आणखी एक प्रेमकहाणी बहरत आहे ती म्हणजे सायली आणि निखिलची म्हणजेच ओवी आणि आदित्यची. या सगळ्यांच्या प्रेमाच्या आड येत आहेत, अंकुश आणि उमाजी. टिझरमध्ये या दोघांमध्येही अनेक खटके उडताना दिसत आहेत. त्यामुळे आता धोंडी -चंप्या आणि ओवी- आदित्यची यांचे प्रेम यशस्वी होणार का, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला १६ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, ” हा एक विनोदी चित्रपट असून यात भरत जाधव, वैभव मांगले यांच्यासारखे जबरदस्त कलाकार आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना लोटपोट हसवेल. एकाच गावातील दोन व्यक्तींमध्ये वैमनस्य असताना त्यांच्या मुलांमध्ये आणि जनावरांमध्ये जेव्हा प्रेमाचे सुत जुळू लागते, तेव्हा होणारी धमाल यात आपल्याला पाहायला मिळणार आहे.”

‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचे सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री हे निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे सहनिर्माते आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज