TOD Marathi

हिवरे बाजार करोनामुक्त!; उपसरपंच यांनी सांगितला ‘गाव कोरोनामुक्तीचा पॅटर्न’

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 19 मे 2021 – सध्या कोरोनाची दुसरी लाट देशात सुरु असली तरी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील हे गाव करोनामुक्त झालं आहे. याचं श्रेय जातं त्या गावचे उपसरपंच पोपटराव पवार यांना. जाणून घेऊ, हिवरे बाजार गावाने कोरोनमुक्तीसाठी कोणता पॅटर्न राबविला.

जिल्हाधिकारी आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांनी उपसरपंच पोपटराव पवारांशी हे गाव कोरोनामुक्त कसं केलं? याबाबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले कि, गावचा करोनामुक्तीचा पॅटर्न सांगितला. मार्च महिन्यामध्ये एका गावकऱ्याला करोनाची लक्षणं दिसली. आम्ही त्याला व त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला विलगीकरणात ठेवलं. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मिळेपर्यंत आम्ही रॅपिड अँटिजेन चाचणी केली.

मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान ५२ करोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्ही त्यांच्यावर उपचार सुरु केले. यासाठी आम्ही डॉक्टरांची मदत घेतली. या रुग्णांपैकी चार जणांना व्हेंटिलेटर्सची गरज होती म्हणून त्यांना आम्ही रुग्णालयात दाखल केलं. दुर्दैवाने त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. पण, आज आमचं गाव करोनामुक्त झालं.

करोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करा :
गावातल्या प्रत्येकाने करोना प्रतिबंधासाठीच्या सर्व नियमांचं पालन केलं. केवळ सोशल डिस्टन्सिंगच नव्हे तर, प्रत्येक घराचा सॅनिटायझेशनसाठी उपयोगी साहित्य ग्रामपंचायतीकडून पुरवलं. त्यासह मास्कही परिधान केले.

तसेच बाजारात सर्व नियमांचं पालन होत आहे का? याकडे लक्ष ठेवण्यासाठी चार गटही नेमले. शेतीच्या कामासाठी बाहेरच्या गाव, राज्यांमधून येणाऱ्या मजुरांना, कामगारांना गावाबाहेर राहण्याची विनंती केली. ग्रामपंचायतीचा एक गट दर आठवड्याला प्रत्येक गावकऱ्याची ऑक्सिजन पातळी आणि तापमानाची नोंद घेत होता.

गावातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येकाला परत येताना सॅनिटायझेशन करणं बंधनकारक केलं होतं. त्यांनी स्वतःला आपल्या परिवारापासून व गावकऱ्यांपासून विलग ठेवणं बंधनकारक केलं होतं. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे, असे पवार सांगतात. गावात आत्तापर्यंत साधारण 200 च्या आसपास ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण झालं आहे. सध्या या गावाची लोकसंख्याच 1600 आहे.