TOD Marathi

दिल्लीतील AIIMS रुग्णालयावर सायबर हल्ला

दिल्लीतील एम्स रुग्णालयावर सायबर हल्ला झालेला आहे. (Cyber attack on Delhi AIIMS hospital) या हल्ल्यामुळे ऑनलाईन नेटवर्कची सर्व कामं ठप्प झालेले आहेत. याचा एकूण परिणाम रुग्णांची ऑनलाइन अपॉइंटमेंट, रुग्णप्रवेश, ओपीडी नोंदणी, डिजिटल हॉस्पिटल सेवा नोंदणी, बिलिंग, स्मार्ट लॅब आणि रुग्णसेवेशी संबंधित अनेक गोष्टींवर होत आहे. ऑनलाइन नेटवर्कशी संबंधित सर्व कामे यामुळे ठप्प आहेत. (All online works stopped because of cyber attack) तूर्तास या सर्व सेवा मॅन्युअल मोडमध्ये पुरवण्यात आल्याची माहिती आहे.

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलसह सर्व केंद्रीय सुरक्षा एजन्सी एम्स सर्वरवरील रँन्समवेअर हल्ल्याच्या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Delhi police inquiring this matter with all security agencies) मात्र, 46 तासांपेक्षा अधिक वेळ गेल्यानंतरही सर्वर रिस्टोअर झालेलं नाही. त्यामुळे अनेक सेवा या मॅन्युअल मोडमध्ये पुरवल्या जात आहेत.

या प्रकरणात संगणक विभागाशी संबंधित दोन कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. एम्स हॉस्पिटल हे दिल्लीतील सगळ्यात मोठया हॉस्पिटल पैकी एक आहे.