टिओडी मराठी, पुणे, दि. 26 जून 2021 – कोरोनाच्या डेल्हा प्लस या व्हेरिएंट्सचा धोका वाढत आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलंय. पुण्यात महापालिकेने आता पुन्हा नवी नियमावली जारी करत निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध सोमवारपासून (28 जून) लागू होणार आहेत.
महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांत कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आगामी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ही संबंधित कारवाई केली जात आहे.
पुणे महापिलाकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी नवी नियमावली जारी केलीय. याबाबत महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन माहिती दिलीय.
असे आहेत पुण्यातील नवे नियम :
1) नव्या नियमावलीनुसार पुण्यातील दुकानांची वेळ आता घटवली आहे. आता पुण्यातील दूकाने ही संध्याकाळी 4 पर्यंतच उघडी ठेवावी लागणार आहेत. संबंधित नवे नियम हे सोमवारपासून (28 जून) लागू होणार आहेत.
2) नव्या नियमावलीनुसार पुण्यातील उद्याने हे सकाळी 7 ते 9 पर्यंत खुली राहणार आहेत.
3) हॉटेल व्यवसायिक संध्याकाळी 4 नंतर पार्सल व्यवस्था सुरु ठेवू शकणार आहेत.
4) पीएमपी वाहतूक सेवा 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे.
5) पुण्यात सायंकाळी 5 नंतर संचारबंदी लागू होणार आहे.