TOD Marathi

राज्यात वादग्रस्त वक्तव्यावरून आधीच वातावरण तापले असताना भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शाळा सुरू करण्यासाठी सरकारकडे अनुदान का मागता? महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Mahatma Phule, Dr. Babasaheb Ambedkar) यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर चांगलीच टिकेची झोड उठवली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केली (In the last few days in the state, Governor Bhagat Singh Koshyari, Minister Mangal Prabhat Lodha, MLA Prasad Lad made controversial statements). त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. त्यांच्या वक्तव्यावरून झालेला गदारोळ संपत नाही, तोच आता चंद्रकांत पाटलांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावर सारवासारव करताना तेव्हाच्या काळात भीक म्हणजे आताच्या काळात सीएसआर, देणगी, वर्गणी अशा पद्धतीचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.