TOD Marathi

नागपुर:
सध्या राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकी संदर्भात मोठ्या चर्चा सुरू आहेत. या निवडणुकीत अनेक लोकांची नामांकन दाखल केली जातील असं सांगितलं जात होतं मात्र शेवटी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि डॉ. शशी थरूर (Mallikarjun Kharge and Dr. Shashi Tharoor) या दोन नेत्यांच्यामध्ये ही लढत होणार आहे.

काँग्रेसच्या वतीने सांगण्यात येत आहे की, ही लढत मैत्रीपूर्ण होणार आहे आणि यामध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi) या तटस्थ भूमिका निभावणार आहेत. शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्रात उपराजधानी नागपुरातून (Nagpur) सुरुवातीला दीक्षाभूमी (Deekshabhoomi) येथे भेट देऊन आणि त्यानंतर सेवाग्राम येथे भेट देऊन सुरू केला.

दरम्यान, त्यांनी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकारांशी संवाद साधला. मात्र शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या नागपूर आणि वर्धा दौऱ्यात काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) हे एकच नेते त्यांच्यासोबत प्रकर्षाने दिसले. याव्यतिरिक्त विदर्भातीलही कुठले नेते त्यांच्यासोबत दिसले नाही. एकंदरीत शशी थरूर यांच्या नागपूर आणि वर्धा दौऱ्याची संपूर्ण जबाबदारी आशिष देशमुख यांनी पेलल्याचे चित्र होते. पक्ष कार्यालयात अर्ज दाखल केला तेव्हा देखील त्यांच्यासमवेत काही मोजकीच मंडळी होती तर मल्लिकार्जुन खरगे यांनी जेव्हा अर्ज दाखल केला तेव्हा काँग्रेसचे अनेक नेतेमंडळी त्यांच्यासोबत होती.

असं असतानाही शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या देहबोलीत ते विदर्भ दौऱ्यावर असताना आत्मविश्वास जाणवत होता. ते आपल्या उमेदवारीबाबत उमेदवार म्हणून आपली बाजू सशक्त असल्याचं सांगतात. त्यासोबतच त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मल्लिकार्जुन खरे यांच्याबद्दलही आदरपूर्वक भावना व्यक्त केल्या आहेत. असं असलं तरी काँग्रेसची मोठी नेतेमंडळी ही मात्र खर्गेंच्या बाजूने अर्ज दाखल करताना दिसली. या पार्श्वभूमीवर शशी थरूर यांनी प्रचाराचा शुभारंभ तर महाराष्ट्रातून केला मात्र महाराष्ट्र शशी थरूर यांना साथ देणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात (Congress state president Nana Patole, senior Congress leader and former Chief Minister Ashok Chavan, Prithviraj Chavan, Balasaheb Thorat) यांच्यासह बाकी सगळी मंडळी आपलं वजन कोणाच्या पारड्यात टाकतात यावर बरीच समीकरणे अवलंबून असणार आहेत. मात्र शशी थरूर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आणि नव्या पिढीला आकर्षित करेल अशा प्रकारचा प्रचार शशी थरूर यांच्या वतीने होत आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज