TOD Marathi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुख्यमत्र्यांना एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. या सर्व पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सर्व तपास यंत्रणा देखील कामाला लागल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहीती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. यापूर्वी महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे एक पत्र मंत्रालय कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी फोन देखील आला होता. या फोनद्वारेही देखील धमकी देण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. आजवर तब्बल तीन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी आली आहे. एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते त्यावेळेस देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी आलेली होती.

मुख्यमंत्र्यांना आलेल्या या या धमकी प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कडक पावले उचलली जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांना आवश्यक त्या विविध सुचना करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने गृहखाते अत्यंत सतर्क झाले आहे. धमकीच्या फोन मध्ये काय म्हटलं आहे, पत्रात नेमक काय आहे याबाबत तपास यंत्रणांकडून मोठी गोपनीयता पाळली जाते आहे. कोणीही अधिकृतरित्या यावर बोललेलं नाही.