TOD Marathi

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू आहे. ही यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होत आहे. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास महाराष्ट्रातील नांदेड (Nanded) जिल्ह्यात ही यात्रा प्रवेश करेल आणि पुढील 14 दिवस राहुल गांधी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून प्रवास करतील. यात्रेचा आज 61 वा दिवस आहे गेल्या 60 दिवसांमध्ये राहुल गांधींनी विविध जिल्ह्यांमधून प्रवास केला आहे.

या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (NCP President Sharad Pawar and Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party Chief Uddhav Thackeray) यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. शरद पवारांच्या प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार या यात्रेत कधी सहभागी होतील याची खात्रीशीर माहिती नसली तरी ते सहभागी होतील अशी माहिती आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे देखील या यात्रेत सहभागी होतील अशी माहिती आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी दिली आहे. ठाकरे आणि पवारांशिवायही विविध पक्षांचे नेते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यामध्ये सहभागी होत आहेत. काँग्रेस पक्षाने यामध्ये अनेक संस्था, संघटना आणि पक्षांना निमंत्रित केलं. मात्र हे सगळं करण्यामागची कारणं काय आहेत?

यापूर्वीही भारत जोडो यात्रेने ज्या राज्यांमधून प्रवास केला आहे त्यामध्येही अन्य पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले आहेत. देशात कधीही निवडणुका झाल्या तरी काँग्रेस आणि समविचारी पक्षांसाठी मुख्य विरोधी पक्ष हा अर्थातच भाजप असणार आहे. 2014 पासून भाजप केंद्रात सत्तेत आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने आपला विजयी रथ कायम ठेवला आहे. त्यामुळे भाजपाच्या विरोधात सर्वांना एकत्र करण्यासाठी या यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. देशातील महागाई, बेरोजगारी अशा मुद्द्यांवरून आहे भाजपला टार्गेट केलं जात आहे.

महाराष्ट्राचा विचार केला तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्यात आला आणि जवळपास तो यशस्वीपणे अडीच वर्ष पार पडला. मात्र पुढे शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या चाळीस आमदारांना सोबत घेऊन भाजप सोबत जात सत्ता स्थापन केली आणि अर्थातच महाविकास आघाडी सरकार कोसळलं. महाविकास आघाडी सरकार कोसळला असलं तरी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातलं समन्वय मात्र व्यवस्थित दिसतंय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जरी वेगळा मार्ग धरला असला तरी 2024 मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात होऊ शकेल का याची एक प्रकारे परीक्षा भारत जोडो यात्रेत होणार आहे.

त्यामुळे ज्या पद्धतीने या यात्रेमध्ये काँग्रेस व्यतिरिक्त अन्य पक्ष सहभागी होत आहेत, त्यामागे काही ना काही उद्देश आहे एवढं नक्की. तेव्हा तुम्हाला काय वाटतं भाजपाला रोखण्यासाठीच काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेमध्ये अन्य पक्ष सहभागी होत आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच….