टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 23 ऑगस्ट 2021 – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री निधन झालं. त्यांनी लखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. मागील दीड महिन्यांपासून ते आजारी होते. कल्याण सिंह यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. तर, जे.पी. नड्डा यांनी कल्याणसिंह यांच्या पार्थिवावर भाजपचा ध्वज टाकून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावरुन आता राजकारण तापले आहे. काँग्रेसने जे.पी. नड्डा यांचा फोटो शेअर करत हा तिरंग्याचा अपमान आहे, असे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जे.पी. नड्डा यांनी कल्याणसिंह यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या पार्थिवावर भाजपचा ध्वज गुंडाळून कार्यकर्त्यांतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहिली. कल्याणसिंह यांची अखेरची इच्छा असल्याने त्यांच्या पार्थिवाला हा ध्वज गुंडाळला होता, असे सांगण्यात आले आहे.
आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपनेही तो फोटो ट्विट केला आहे. त्यावरुन, युवक काँग्रेस आक्रमक झाले आहे. युवक काँग्रेसने ट्विट करुन हा तिरंग्याचा अपमान आहे, असे म्हटलं आहे. ‘तिरंगे कर अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान।’, असे ट्विट युथ काँग्रेसने केलं आहे.
युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनीही हा फोटो शेअर केलाय. तसेच, नव्या इंडियामध्ये देशाच्या राष्ट्रध्वजावर भाजपचा झेंडा लावणं योग्य आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. त्यावरुन, आता भाजप नेत्यांवर टीका केली जात आहे.
तर समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनीही भाजपला लक्ष्य केलंय. देशापेक्षा पक्ष मोठा आहे, राष्ट्रध्वजावर भाजपच झेंडा, नेहमीप्रमाणं भाजपला ना दु:ख, ना खेद, ना पश्चाताप, असे तिवारी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.
तिरंगे कर अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान। pic.twitter.com/bb5j4KpKjt
— Indian Youth Congress (@IYC) August 22, 2021
Is it ok to place party flag
over Indian flag in New India? pic.twitter.com/UTkfsTwUzz— Srinivas BV (@srinivasiyc) August 22, 2021