TOD Marathi

नवी दिल्ली : सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने रविवारी सीएनजीच्या किंमतीत दोन रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. डिझेल, पेट्रोलच्या पाठोपाठ सीएनजीच्या दरामध्ये देखील वाढ होत आहे आणि वाहनधारकांसाठी ही चिंतेची गोष्ट आहे.

सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे दिल्लीमध्ये 71.61 रुपये प्रति किलो दराने सीएनजी मिळत आहे तर मुंबईत सीएनजीची किंमत 76 रुपये प्रति किलो एवढी आहे. पुणे शहरात सीएनजीची किंमत 73 रुपये प्रति किलो आणि नागपूर मध्ये सर्वाधिक 115 रुपये प्रति किलो एवढी आहे.

काही दिवसांपूर्वीच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती मध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. या इंधन दरवाढीचा मोठा फटका देशातील सर्वसामान्य नागरिकांना बसतोय.