टिओडी मराठी, नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2021 – उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स लाईफ सायन्सेसकडून तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीला डीसीजीआयकडून क्लिनिकल ट्रायलची परवानगी मिळालीय. हि दोन डोसची रिकॉम्बिनेंट प्रोटीन-बेस्ड लस आहे. रिलायन्स लाईफच्या अर्जाचे एसईसीच्या बैठकीत अवलोकन झाले असून मंजूरी दिली आहे.
रिलायन्सने आपल्या प्रस्तावित लसीच्या फेज-1 चाचणीसाठी डीसीजीआयशी संपर्क साधला होता. रिलायन्स लाईफ ही रिलायन्स इंडस्ट्रीजची अधिकृत कंपनी असून ही कंपनी मागील काही दिवसांपासून लसीवर काम करत आहे, असे सांगितले जात आहे.
58 दिवसांची टॉलरेटेड डोसच्या ताकदीच्या चाचणीसाठी सामान्यपणे फेज-1 ट्रायल असते. जी पूर्ण झाल्यानंतर फेज 2 आणि फेज 3 साठी ट्रायलसाठी अर्ज केला जात आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेक कोव्हॅक्सिनचा देशामध्ये सर्वात अधिक वापर होत आहे. तर भारतात इमर्जन्सी वापरासाठी रशियाची स्पूटनिक व्ही, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन आणि झायडस कॅडिलाच्या कोरोना प्रतिबंधक लसीला परवानगी दिलीय.