टिओडी मराठी, दि. 15 मे 2021 – सात महिन्याचा अंतराळ प्रवास, तीन महिने मंगळ ग्रहाच्या कक्षेत भ्रमण केल्यानंतर चीनच्या जुरोंग रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर शनिवारी सकाळी उतरले. जुरोंग रोव्हरने शेवटची सात कठीण मिनिटे यशस्वी पार केली. हे रोव्हर यशस्वीरित्या उतरल्याचे चायना नॅशनल स्पेस अॅडमिनीस्ट्रेशन (सीएनएसए) जाहीर केलं आहे.
सीएनएसएच्या म्हणण्यानुसार चीनचे मंगळ ग्रहावर उतरलेले जुरोंग हे पहिले रोव्हर असून तियानमेन १ ने १० फेब्रुवारी रोजी मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला होता. मंगळ ग्रहासंबंधी महत्वपूर्ण माहिती यामुळे मिळू शकली. पण, आता जुरोंग मंगळ पृष्ठभागावर उतरल्याने तेथील बर्फ, जमीन यांची आणखी माहिती मिळणार आहे.
या रोव्हरचे नाव देवावरून ठेवले आहे. जुरोंग हे चीनी अग्नीदेवतेचे नाव असून मंगळ सुद्धा अग्नी ग्रह मानला जातोय. तियानचेनच्या पोटात हे रोव्हर होते. तियानचेन सतत रोव्हर व लँडरसाठी मॅपिंग करत होते. भारताने २०१४ मध्ये सोडलेले मंगळयान मंगळ कक्षेत आजही स्थिर आहे. आणि मंगळाची महिती आजही इस्रोकडे पाठवित आहे.