TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 9 जुलै 2021 – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी केली आहे. त्यामुळे ते तीन महिने विश्रांती घेणार आहेत. या दरम्यान कोणत्याही राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार नाहीत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं आहे. तसेच याबाबत मेडिकल बुलेटिन जाहीर केलं आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी झाल्याची माहिती दिलीय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी केली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही, असे डॉक्टरानीं सांगितलं आहे.

आणखी काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरून दररोज देण्यात येणार आहे, असं रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केलंय. मात्र, प्रकाश आंबेडकर यांना कोणत्या रुग्णालयात आणि कुठे दाखल केलं आहे? हे स्पष्ट केलेलं नाही.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?
प्रकाश आंबेडकर यांनी काल ट्विटरवरून एक व्हिडीओ ट्विट करून तीन महिने कार्यरत राहणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. मी स्वत: तीन महिने पक्षात कार्यरत राहणार नाही. या काळात कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही. माझ्या व्यक्तिगत कारणासाठी मी तीन महिने सुट्टीवर जाणार आहे, असा निर्णय घेतला आहे. पक्ष चालला पाहिजे. संघटन चाललं पाहिजे.

पाच जिल्ह्यात निवडणुका आहेत. त्यासाठी पक्षाला अध्यक्ष हवाय. त्यामुळे रेखा ठाकूर यांची महाराष्ट्र प्रदेशच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यामुळे तुम्ही सर्व रेखा ठाकूर यांना सहकार्य कराल आणि पाच जिल्ह्यातील निवडणुकीमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल कराल, अशी आशा आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमधून म्हटलं होतं. त्यामुळे वेगवेगळे राजकीय कयास वर्तवले जात होते. मात्र, आज त्यांच्या बायपास सर्जरीचे वृत्त पुढे आले आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज