टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 10 ऑगस्ट 2021 – दिल्ली येथील जंतरमंतरवर जातिवाचक घोषणाबाजी केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते अश्विनी उपाध्याय यांच्यासह सहा जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. दिल्लीतील जंतर – मंतर इथे दि. ८ ऑगस्ट रोजी निदर्शनादरम्यान हा प्रकार घडला.
दिल्लीमध्ये जंतर – मंतरवर भारत जोडो आंदोलनाच्या वतीने निदर्शने केली होती. या आंदोलना दरम्यान जातीय घोषणाबाजी केल्या होत्या. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अश्विनी उपाध्याय यांच्यासह विनोद शर्मा, दीपक सिंग, दीपक, विनीत क्रांती, प्रीत सिंह यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखाही या प्रकरणामध्ये सक्रिय आहे. घोषणा देणाऱ्या पिंकी चौधरीचा दिल्ली पोलीस अजून शोध घेत आहेत.
व्हिडिओची सत्यता तपासली पाहिजे. जर ती खरी असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. जर व्हिडीओ बनावट असेल तर कारवाई करावी. आमचा दोष एवढाच आहे की, आम्ही भारत छोडो दिन साजरा करण्यासाठी इंग्रजी कायद्यावर आक्षेप घेण्यासाठी गेलो होतो, अशी मागणी अश्विनी उपाध्याय यांनी अटक केल्यानंतर केलीय.