TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 10 ऑगस्ट 2021 – जगातील लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपप्लिकेशन असलेलं व्हाॅट्सअ‍ॅप नागरिकांसाठी नवे फिचर्स देत असते. त्यामुळे मागील काही वर्षात भारतात नव्हे तर जगात व्हाॅट्सअ‍ॅप लोकप्रिय ठरलंय. व्हाॅट्सअ‍ॅप आल्यापासून चॅटिंगच्या माध्यमातून बोलण्याचे प्रमाण वाढलंय. त्यातच आता व्हाॅट्सअ‍ॅपचे नवं फिचर बाजारात येणार आहे.

सध्याच्या काळामध्ये व्हाॅट्सअ‍ॅपमध्ये इमोजी खूप वापरले जाताहेत. त्यामुळे आता व्हाॅट्सअ‍ॅपने वेळोवेळी नवे इमोजी युझरच्या वापरात आणलेत. त्यात आता इमोजी चाहत्यांसाठी एक नवे फिचर व्हाॅट्सअ‍ॅप लवकरच लाँच करणार आहेत.

व्हाॅट्सअ‍ॅपने लेटेस्ट इमोजी पॅकचा समावेश करण्यास सुरूवात केलीय. अॅड्राईड फोनच्या बिटा बिल्डमध्ये या नव्या इमोजींचा समावेश केला जात आहे. त्यामुळे आता युझरची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

नव्या इमोजी पॅकमध्ये फायर हार्ट, दाढी असलेले चेहरे त्यासोबत अनेक किंसिंग असलेल्या चेहऱ्याच्या इमोजींचा समावेश केला आहे. अॅड्राईडसोबत अॅपलच्या देखील इमोजी पॅकमध्ये या फिचरचा समावेश असणार आहे.

जे युझर्स बिटा बिल्ड असलेला फोन वापरतात त्यांना हे इमोजी वापरता येणार आहेत. ज्यांचा बिटा बिल्ड नसेल त्यांच्या फोनवर मॅसेज पाठवल्यास तो त्यांना दिसू शकणार नाही.