मुंबई : आधीच राज्यातील महागाईने सर्वसामान्याचं कंबरडं मोडलं आहे. (Commom man facing problems because of inflation) त्यातच आता पावसाच्या वाढत्या प्रमाणामध्ये पूराची चिंता नागरिकांना सतावत आहे. सामान्य नागरिकांना दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागत आहेत. यातच सामान्या नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.
राज्यातील घरगुती गॅस सिलेंडरचे (LPG rate increased) दर वाढले आहे. नागरिकांना आता गॅस दरासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 14 किलोच्या गॅस सिंलेडर मध्ये आता 50 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. नागरिकांना आता घरगुती गॅस सिंलेडरसाठी 1000 पेक्षा अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. 5 किलोच्या घरगुती सिंलेडर मध्ये 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
दोन वर्षात कोरोना (CORONA) नंतर विस्कटलेली घडी जुळण्यासाठी सर्वसामान्याचे प्रयत्न सुरुच आहे. आता पुन्हा एकदा गॅस सिलेंडर दराने गृहिणीचे बजेट सावरण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
जगभरात ऊर्जेची मागणी वाढली आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने दर वाढल्याचे सांगितलं जात आहे. 1 मे रोजी कमर्शियल गॅस सिंलेडर मध्ये वाढ करण्यात आली होती.