TOD Marathi

जाणून घ्या, चहा पिण्याचे फायदे; इम्यूनिटी वाढवण्याचं टेंशन होईल दूर

टिओडी मराठी, दि. 21 मे 2021 – भारतीय संस्कृतीतमध्ये चहा हे नेहमीचं  सेवन करण्यात येणारं पेय म्हणून ओळखलं जातं. चहामुळे अनेक प्रकारचे फायदे आहेत. त्यात इम्यूनिटी वाढवण्यापासून ते पौष्टीक तत्वे मिळविण्यापासूनच्या बाबींचा अंतर्भाव होतो. आज जागतिक चहा दिवस या निमित्ताने चहाचे फायदे आणि नुकसान काय आहेत?, ते आपण जाणून घेऊया. 

कोरोना काळात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी अनेक उपायांचा वापर लोकांकडून केला जात आहे. लॉकडाऊन, संचारबंदी आदींमुळे सतत घरात बसून राहिल्यानं अनेकांच्या मनावर प्रचंड ताण वाढतो. हा टॅन कमी करण्यासाठी चहाचं सेवन फायदेशीर ठरतं. चहा प्यायल्यानं काही वेळासाठी का होईना इतर गोष्टींचा विसर पडतो. थोडं रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं.

चहामध्ये तणाव दूर करण्याचे घटक असतात. त्यामुळे थकवा, आळस दूर होतो , असे एका संशोधनातून समोर आले आहे. दूधाच्या चहा इतकाच कोरा चहा, पुदीना, लेमन टी, आल्याचा चहा असे वेगवेगळ्या प्रकारचे चहा शरीरासाठी फायदेशीर असतात. चहामधील तुळस आणि आलं सर्दी खोकल्याच्या आजारापासून दूर ठेवते. तसेच आरोग्यासाठी चहा फादेशीर असला तरी अति सेवन न करता दररोज घ्यायला काही हरकत नाही, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

चहा शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतो. ज्यामुळे आपलं सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते. सर्दीमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून सुटका मिळते.

आल्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी आलं उपयोगी ठरतं. त्यासह पचनक्रिया सुरळीत राहते. वात, पित्त आणि कफ यांसारख्या समस्या दूर ठेवण्यासाठी आल्याचा चहा उपयुक्त ठरतो.

आल्याच्या चहामध्ये व्हिटॅमिन, खनिजे आणि अमिनो अॅसिडचे प्रमाण असते. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत मिळते. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित असलेल्या समस्या कमी होतात. याशिवाय धमण्यांवर चरबी साचू नये, यासाठी आले उत्तम कार्य पार पाडते. यामुळे हृदयविकाराचा झटका व पक्षाघाताचा धोका कमी होतो.

मासिक पाळीवेळी महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या दिवसांत आल्याचा चहा पिणं उपयुक्त ठरतो. रक्तप्रवाह सुरळीत होतो.

जाणून घेऊ, चहा पिण्याचे फायदे आणि नुकसान :
१) चहा आपल्या पचन तंत्राला साल्विया, पित्त व गॅस्ट्रिक ज्यूस तयार करण्यास मदत करतो. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सचं प्रमाण जास्त असल्याने हे शक्तीशाली अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरीसारखं काम करतं. ज्यामुळे पचनक्रियेशी संबंधित अनेक कमतरता पूर्ण केल्या जातात.

२) चहामध्ये असणारं फेनोलिक तत्व पोटातील आतड्यांच्या आतील भागात आयर्न कॉम्प्लेक्स तयार करून पचनक्रियेत अडचण निर्माण करतं, असे काही रिसर्च सांगतात.

३) आहारात व्हिटॅमिन सी नसेल तर, लेमन टी घ्या, असा सल्ला दिला जातो.

४) आयर्नची कमतरता असलेल्या लोकांनी जेवताना चहा घेऊ नये. जेवणावेळी दरम्यान चहा प्यायल्याने शरीरात कॅटलिनची कमतरता होते. कॅटलिन चहामध्ये आढळणारं एक तत्त्व आहे. ज्याचा अनेक सायकॉलॉजिकल कामात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

५) जेवणासोबत चहा प्यायचा असेल तर ग्रीन टी किंवा जिंजर टी घेऊ शकता, याने पचनक्रियेला मदत होते.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज