टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 29 जुलै 2021 – सर्वोच्च न्यायालय हे भारताचे न्यायदानाचे सर्वोच्च क्षेत्र आहे. याठिकाणी थोडाही वेळ वाया जाऊ दिला जात नाही. तसेच ॲडव्होकेट ॲक्टचे पालन करून वकिलांची ये-जा सुरु असते. तरीही काही गंमती-जमती घडत असतात. अशावेळी न्यायमूर्तीकडून योग्यवेळी समाचार घेतला जातो. एका सुनावणीवेळी न्यायमूर्ती यांनी अवतार पाहून वकीलाला सूचना केली. न्यायमूर्ती वकिलाला म्हणाले, किमान केस तरी विंचरून येत जा. यावरून सर्वोच्च न्यायालय वकिलांनी कसे वागले पाहिजे, वर्तन कसे ठेवले पाहिजे? याचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही.
सर्वोच्च न्यायालयामध्ये एक वकील केस न विंचरता आले होते. न्यायालयामध्ये आपल्या अशीलाची बाजू मांडत होते. तेव्हा ‘किमान केस तरी विंचरून’ या असे न्यायमूर्ती यांनी वकीलाला सुनावले. इतकेच नव्हे तर, तर एका सुसाईड केसमध्ये न्यायमूर्ती यांनी वकीलांना टोमणे देखील मारले.
सर्वोच्च न्यायालयामध्ये एका अपघाताच्या प्रकरणात सुनावणी सुरू होती. एक वकील बाजू मांडत असताना न्यायमूर्ती म्हणाले, की तुम्ही सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहात ही एक सन्मानाची गोष्ट आहे.
परंतु कोर्टामध्ये येताना किमान केस तरी विंचरत जा.’ मी म्हणत नाही केसांना तेल लावा, पण, स्वतः टापटीप रहायला शिका, अशी सूचना न्यायमूर्ती यांनी वकीलाला केली.
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये एका आत्महत्येच्या खटल्यावर सुनावणी सुरू होती. एका व्यक्तीने आत्महत्या करून सुसाईड नोट लिहून ठेवली होती, या प्रकरणामध्ये प्रेमाचा कुठलाच अँगल नाही, अशी बाजू वकील मांडत होते. तेवढ्यात वकीलांचा दोनदा मोबाईल फोन वाजला.
तेव्हा न्यायमूर्ती अब्दुल नजीर मस्करीत म्हणाले की, ही लव स्टोरीच आहे, यात बॅकग्राऊंड म्युझिक तर बघा. त्यानंतर न्यायमूर्ती नजीर यांनी सुसाईड नोट वाचली आणि म्हणाले ‘हे पत्र तर पहा. जणू काय एखाद्या वकीलानेच लिहिलं आहे, एवढे प्रोफ़ेशनल !.