टिओडी मराठी, कोल्हापूर, 29 ऑगस्ट 2021 – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे निर्दोष आहेत. भाजपने परमबीर सिंग यांना हाताशी धरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला तसेच अनिल देशमुख यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले होते. याबाबत मी वारंवार बोलत आलो आहे. मात्र, आता त्यांना प्राथमिक अहवालातून क्लिनचिट दिली आहे.
खरंतर या सगळ्यामागे खाकी वर्दीतले दरोडेखोर परमबीर सिंग आहेत. त्यांनाच आता अटक करा, अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. ते कोल्हापूर इथे बोलत होते.
मागील सहा महिन्यांपासून मी वारंवार अनिल देशमुख निर्दोष आहेत. याबाबत सांगत आलोय. मात्र, आता तर ते खरे झालं आहे. खंडणीबाबत कोणताही पुरावा सीबीआयला मिळालेला नाही, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
याउलट परमबीर सिंग यांनीच वाझे यांना नोकरीमध्ये समावेश करून घेत मोठ्या पदाची जबाबदारी दिली आहे. याशिवाय ते सातत्याने वाझे यांना घेऊन वरिष्ठ मंत्र्यांसह अधिकाऱ्यांकडे सुद्धा ब्रिफिंगसाठी जात होते.
याशिवाय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी स्फोटके ठेवली होती, त्यात सुद्धा परमबीर सिंग हेच जबाबदार आहे, असे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे. यादरम्यान, अनिल देशमुख हे निर्दोष असून त्यांना यामध्ये अडकवून त्यांना त्रास दिला आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.