पुणे: प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर आयोजित केलेल्या परेडमध्ये नारीशक्ती लेफ्टनंट कमांडर आंचल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या मार्चिंग पथकाच सादरीकरण झालं आहे. आंचल शर्मा यांनी आपल्या शौर्याने आणि मेहनतीने जिल्ह्यासह राज्याचही नाव मोठं केल आहे. अांचल यांचं नेतृत्व पाहून त्यांचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत.
मूळ उत्तर प्रदेशातील मेरठच्या असणाऱ्या आंचल शर्मा गेल्या पाच वर्षांपासून नौदलात कार्यरत आहेत. चार वर्षात एका महिला कमांडरला ही जबाबदारी मिळाली आहे, ज्यात नौदलाच्या पथकाला प्रजासत्ताक दिनाच्या परेडच सादरीकरण करण्यात आल आहे.
आंचलच यांचे वडील अंबरिश कुमार हे सुभेदार मेजर पदावरून निवृत्त झाले असून आता ते शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आंचल यांचे पती मयंक हे देखील नौदलात लेफ्टनंट कमांडर आहे.
यावेळी प्रजासत्ताकदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
दहशतवादी घटनांबाबत गुप्तचर यंत्रणांनी जारी केलेल्या ‘अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गस्त वाढवली आहे.
खबरदारी घेत, दिल्ली पोलिसांनी शेजारील राज्यांमधील त्यांच्या समकक्षांशी समन्वय साधून राजधानीच्या सीमाही सील केल्या आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षेसाठी 27 हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच सशस्त्र पोलीस दलाचे कर्मचारी आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल म्हणजेच (CAPF) कमांडो, अधिकारी आणि जवानही तैनात करण्यात आले आहेत. तर फेशियल रेकग्निशन सॉफ्टवेअरसह सुसज्ज सीसीटीव्ही आणि ड्रोनविरोधी उपकरणेही सुरक्षेसाठी बसवण्यात आले आहेत.