केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah on Mumbai Tour) मुंबईत येत असल्याने त्यांच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत अतिरिक्त पोलिस दल तैनात केला असून पोलीस बंदोबस्तही वाढवला आहे.
गृहमंत्री अमित शाह रविवारी रात्री 9.30 वाजता मुंबईत दाखल होतील. त्यानंतर ते रात्री सह्याद्री गेस्ट हाऊसला मुक्कामी राहतील. सोमवारी सकाळी नऊपासून त्यांचा दौरा सुरू होणार आहे. ज्यात ते लालबागचा राजा, सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या गणपतीचेही दर्शन घेणार आहेत. (CM Eknath Shinde, DCM Devendra fadnavis, Ashish Shelar)
अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यामुळे शनिवारी रात्रीपासूनच वेगवेगळ्या चौक्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (Mumbai Police) पोलिस दलाची साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली असून, गणेश उत्सव झाल्या आठवड्याच्या शेवटी व्यवस्थापित केली जाईल. दरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनाही बंदोबस्ताचा भाग होण्यास सांगितले आहे. अमित शाह यांचे शहरात आगमन होण्यापूर्वी सायंकाळी 4 वाजल्यापासून मुंबईभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळणार आहे.
रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) ही दंगल आणि गर्दी नियंत्रण परिस्थिती हाताळण्यासाठी भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक विशेष शाखा आहे. देशाचे गृहमंत्री मुंबईत येत आहेत. त्यामुळे स्वाभाविकच मुंबईत सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे. अमित शहांचा हा दौरा आगामी महापालिका निवडणूक आणि शिंदे-फडणविस सरकारच्या पुढील वाटचालीकरताही महत्वाचा मानला जातोय.
अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक अमित शहा यांच्या नेतृत्वात होईल. गेल्या पंचवीस वर्षापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेत आहे. त्याच दृष्टीने अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ देखील होईल.