TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 4 ऑगस्ट 2021 – यंदा अतिवृष्टीमुळे कोकण भागातील महाड आणि चिपळूणला मोठा फटका बसला. इथल्या भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तर, या आलेल्या पुरात वाडी, वस्त्या पाण्याखाली गेल्या होत्या. त्यामुळे इथल्या पूरग्रस्तांची हानी अधिक प्रमाणात झाली. त्यांचे जीवनावश्यक साहित्यासह घर, दुकान आदींचे नुकसान झाले. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी अखिल दत्तवाडी ट्रस्टच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य देण्यात आले.

यात ब्लँकेट, चटई,, साड्या, लहान मुलांचे कपडे, औषधे, पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आदींचा समावेश आहे.हे सर्व साहित्य त्यांनी महाड आणि चिपळूण पुरग्रस्तांच्या वाडी -वस्त्यांमध्ये जाऊन दिले आहे.

अखिल दत्तवाडी उत्सव कमिटी आणि ट्रस्टचे पदाधिकारी, सभासद यांनी ही मदत योग्य ठिकाणी स्वतः नेऊन गरजू लोकापर्यंत रविवारी (दि.१/८/२०२१) पोहचवली आहे, असे ट्रस्टच्या वतीने सांगितले आहे.

याचा दुसरा टप्पा म्हणून आता सांगलीमधील पूरग्रस्त आणि दुर्लक्षित गाव बहे (तालुका.- वाळवा, जि. सांगली) इथल्या नागरिकांना मदतीची गरज आहे. हे गाव पुणे शहरापासून १८० किलोमीटर अंतरावर आहे.

या गावांत ११ मारुती पैकी एक मारुती आहे. सध्या ५० टक्के गाव पुरामुळे बाधित झालेले आहे. त्यामुळे तिथल्या १५० घरांना मदतीची गरज आहे. त्यांच्या विनंती आणि मागणीचा विचार करून मदतीचे आवाहन केले आहे.

त्याचा विचार करून आपण समस्थ ग्रामस्थांच्या वतीने जीवनावश्यक साहित्याची मदत देण्यासाठी बुधवारी (दि. ४/८/२०२१) सकाळी ५ :०० वाजता जाणार आहोत, असेही ट्रस्टने सांगितले आहे.

तर पुण्यातील मुळशी तालुक्यातील माले गावी ५० कुटुंबाना ही मदतीची आवश्यकता आहे. यासाठी, शनिवारी (दि. ७/८/२०२१) त्यांनाही जीवनावश्यक साहित्याची मदत दिली जाणार आहोत. तसेच सांगली मधील पूरग्रस्त कुटुंबांना आणखी आम्ही मदत करणार आहे, असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.