TOD Marathi

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना शिवराळ भाषा वापरली तरी अजित पवारांनी साधं ट्विट देखील केलं नाही. फक्त सुप्रिया सुळेंचे (Supriya Sule) भाऊ म्हणूनच नाही तर राज्यातील सक्रिय विरोधी पक्षनेते पद असूनही अजित पवार इतका वेळ शांत का आहेत, त्यांच्या डोक्यात काही वेगळेच विचार सुरु आहेत का? असे प्रश्न अनेक चर्चांना खतपाणी घालत आहेत.

इतकंच नाही तर शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय मंथन शिबिरातही अजित पवार गैरहजर होते (Ajit Pawar was also absent from the NCP’s two-day brainstorming camp held in Shirdi). त्यांची गैरहजेरी राज्याचं लक्ष वेधणारी ठरली. ती अधिक ठसली नाही कारण शरद पवारांच्या उपस्थितीमुळे. 81 वर्षांचे शरद पवार. न्यूमोनिया असतानाही रुग्णालयातून उठून हेलिकॉप्टरने मंथन शिबिरात पोहोचले. कधी नव्हे ते फक्त 5 मिनिटं कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि परत रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. अजित पवार अस्वस्थ आहेत, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. त्यामुळेच तर हाताला सलाइनसाठीचं बँडेज घेऊन शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या मंथन शिबीरात पोहोचले. पक्षात सर्वकाही आलबेल आहे, असं दाखवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला गेला. मात्र अजित पवार यांचा आधीपासूनच दुसरा कार्यक्रम ठरला होता, असं सांगून जयंत पाटील यांनी त्या शिबिरावेळी वेळ मारली. अन् अब्दुल सत्तार प्रकरणावर अजित पवार यांची प्रतिक्रिया का नाहीयेत, असा प्रश्न विचारला असता “अजित पवार सध्या आजोळच्या कार्यक्रमासाठी गेले आहेत”, परत आल्यावर ते योग्य उत्तर देतील, असं जयंत पाटील म्हणाले.

सुप्रिया सुळे त्यांच्या भगिनी आहेत. आमच्या बहिणीबाबत असे शब्द वापरल्यावर सर्व कुटुंबातच नाराजी आहे. पक्ष म्हणून पक्षाचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांच्याकडून आम्ही वेगवेगळ्या भूमिका मांडतोय, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. मात्र हे सगळं सुरू असताना अजित पवार मात्र अलिप्त आहेत. तेव्हा ते का शांत आहेत. हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज