विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तीन राज्यात पराभव पत्करावा लागल्याने सध्या नाराजी आहे. या निकांलामुळे भाजपने इंडिया आघाडीला लक्ष्य केलं. निकांलावर अनेक नेते प्रतिक्रिया देत आहेत. अशातच शिवसेने उबाठा गटाने नेते संजय राऊत यांच्या विधानाने इंडिया आघाडीबाबत चर्चा सुरु आहे.
काँग्रेससारखा मोठा पक्ष असतो तेव्हा त्या राज्यातील लहान-लहान घटकांना विश्वासात घेतलं जात नाही. आघाडी पुढे घेऊन जायची असती तेव्हा पक्ष लहान असो वा मोठा सर्वांना सोबत घेऊन गेले असते तर कदाचित चांगला फायदा होऊ शकला असता असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात २०१४ मध्ये शिवेसनेच्या बाबतीत झालं होतं, मोदींची लाट आल्यानंतर शिवसेनेसोबतची युती तोडली. आता भाजपाला पुन्हा लाट दिसत आहे, त्यामुळे मला चिंता आहे की सरकारसोबत जे बसले आहेत त्यांचं काय होणार. आपका क्या होका कालिया असा सवाल आहे. परंतु, काँग्रेससोबत आमचं नातं होतं तसं आहे. दिल्ली स्तरावर आमचं बोलणं सुरू आहे. महाराष्ट्रात त्यापद्धतीने जागावाटप केलं जाईल असं देखील राऊत म्हणाले.