टिओडी मराठी, दि. 25 ऑगस्ट 2021 – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल पोलिसांनी अटक केली मात्र रात्री उशिरा नऊ साडेनऊच्या सुमारास न्यायालयाकडून नारायण राणे यांना जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना फोन करून म्हणाले भाजप पक्ष तुमच्या पाठीशी आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी रत्नागिरी पोलीस गेले होते. यावेळी अटक होण्यापूर्वी नारायण राणे यांनी अटक होऊ नये,यासाठी रत्नागिरी येथील न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन साठी अर्ज दाखल केला होता मात्र तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर नारायण राणे यांनी उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालय मध्ये ही मूळ कागदपत्र आणि इतर करणा भावी तात्काळ याचिका सुनावणीस घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे नारायण राणे यांना पोलिसांनी महाड येथील न्यायालयामध्ये हजर केले.
यावेळी जामीन मंजूर करताना महाड कोर्टाने काही अटी घातल्या आहेत. तसेच नारायण राणे यांना पंधरा हजारच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला तसेच भविष्यात असं वक्तव्य करणार नाही असेही सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री बद्दल वापरलेल्या अपशब्द याचे ऑडिओ चेक करण्यासाठी नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात यावे लागणार आहे. त्यासाठी राणे यांना सात दिवसाची नोटीस दिली जाणार आहे.
त्याचबरोबर 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हा शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. यादरम्यान कागदपत्रे आणि पुराव्या सोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड येथील कोर्टाने राणे यांना बजावलं आहे.