टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 3 जुलै 2021 – अंतराळात झेप घेणाऱ्या कल्पना चावलानंतर आता सिरीशा बादला हि दुसरी भारतीय तरुणी लवकरच आंतराळात उड्डाण घेणार आहे. येत्या 11 जुलैला न्यू मॅक्सिको येथून उड्डाण होणार आहे. सिरिशा अंतराळात संशोधन विभागाची जबाबदारी सांभाळणार असून अंतराळ मोहिमेवर जाणाऱ्या ६ जणांच्या पथकात दोन महिलांचा समावेश आहे. सिरिशासह आणखी एक बेश मोसिस या महिला शास्त्रज्ञाचा समावेश आहे.
34 वर्षीय सिरिशा या अॅरोनॉटिकल इंजिनिअर असून इंडियानाच्या पर्ड्यू विश्वविद्यापीठातून पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय.
कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळात झेप घेणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय महिला ठरणार आहेत. आतापर्यंत चार भारतीय अंतराळात गेलेत.
सिरीशाने केलेल्या ट्विटनुसार, तिला युनिटी 22 क्रू आणि कंपनीचा एक भाग होणार आहे, हि बाब तिच्यासाठी अतिशय अभिमानास्पद आहे, असं तिनं म्हटलं आहे.
सिरिशा बांदला यांचा जन्म भारतात आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात एका गावात झाला आहे. तर टेक्सासच्या ह्यूस्टनं येथे त्यांचं शालेय शिक्षण झालंय.
https://www.instagram.com/p/CQ1sQFAjPdZ/?utm_source=ig_web_copy_link